🕒 1 min read
मुंबई: सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज (७ मार्च) विविध मुद्द्यांवरून आक्रमक झाल्याचे दिसून आले. आता त्यांनी कृषी पंपाच्या वीज तोडणीवरून ठाकरे सरकारला चांगलेच निशाण्यावर धरले आहे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी तत्काळ थांबण्याचे आदेश सरकारने द्यावेत. अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील सुरज जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. मला पुन्हा शेतकरी म्हणून जन्म घ्यायचा नाही. या सरकारला शेतकऱ्याची काळजी नाही असे म्हणत फेसबुक लाईव्ह करत त्याने आत्महत्या केली. बीडमध्ये देखील एका शेतकऱ्याने चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. अशी उदाहरणे देत राज्यात सुलतानी पद्धतीने शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज तोडणी सुरु असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
मागच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते की, आम्ही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज कट करणार नाही. मात्र, उपमुख्यमंत्र्यांचे ऊर्जामंत्री ऐकत नाहीयेत. ऊर्जामंत्री जाहीर बोलतात की वीज बील भरले नाही तर वीज कट करु. सध्या अधिवेशन सुरु असताना शेतकऱ्याने आतम्हत्या केली आहे. मग चर्चा कुठे करायची? असा सवाल करत सरकारने त्वरित वीज तोडणी थांबण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“…तर अजित पवारांना फासावर लटकवणार का”, देवेंद्र फडणवीसांचा संतप्त सवाल
-
“वैराग्याच्या काळातही बगल में छुरी…”; गोपीचंद पडळकरांची शरद पवारांवर खोचक टीका
-
मुलाला मिळेना बॉलीवूडमध्ये काम; म्हणून ही मराठी अभिनेत्री आहे चिंतेत !
-
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ जाहीर, तर ‘या’ दिग्गजांना दिला डच्चू
- “चप्पल भिरकावणं ही महाराष्ट्राची पद्धत नक्कीच नाही”, ‘त्या’ घटनेवर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
