Share

पाच राज्याच्या निवडणुका होताच केंद्र सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढ करणार; रोहित पवारांनी साधला निशाणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. पाच राज्यातील निवडणुका होताच केंद्र सरकार आपल्या आवडीचा पेट्रोल-डिझेल दरवाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. ती ७ तारखेला मतदान होताच होईल की निकालानंतर हे बघावं लागेल. असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

तसेच लोकांना दिलासा देण्याची सरकारची जर इच्छा असेल तर एक्साईज ड्युटी कायम ठेवून सेस कमी करावा.जेणेकरुन त्याचा फटका राज्यांना बसणार नाही. असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यानेही दर कमी करावेत, असं काहीजण म्हणतील, त्यांची भूमिका चुकीची नसली तरी राज्याची आजची बिकट आर्थिक स्थिती व केंद्र सरकारकडं अडकलेला हक्काचा GST चा मोठ्या प्रमाणातील निधी याचा विचार करता, आज ते शक्य होईल, असं मलातरी वाटंत नाही.अशी शक्यताही रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान १० मार्च नंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडेल असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. तर आज रोहित पवार यांनी पेट्रोल-डीजेल दरवाढ वरून भाजपला निशाण्यावर धरले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!