🕒 1 min read
मुंबई: राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू होते असं विधान केलं होतं. त्यावरून राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. हा वाद सुरू असतानाच राज्यपालांनी महात्मा फुलेंच्या विवाहावरूनही विधान केलं. त्यावरूनही सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांवर जोरदार टीका केली. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आता भाष्य केलं आहे.
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, राज्यपाल हे एक मोठं पद आहे. महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने बोलत असताना आपल्यावर सगळ्यांचे लक्ष असते हे लक्षात ठेवावे आणि विचार करून शब्द बोलायचा असतो, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांना दिला आहे.
एसटीच्या मुद्द्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, आजूबाजूच्या राज्यातील एसटीचा विचार करता जेवढं देणं शक्य होतं तेवढं देण्याचा प्रयत्न परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन घेतलेला आहे. एसटी कर्मचारी एसटीचे विलिनीकरणच पाहिजे अशी मागणी करत होते. प्रत्येकाने अशी भूमिका घेतली तर कुणीही राज्यकर्ते असले तरी त्यांना ही मागणी न परवडणारी आहे, असं पवार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
‘आपल्या दहशतीमुळे विधानसभा तहकुब करून सरकार पळून गेलं’- देवेंद्र फडणवीस
-
‘पोलिसांवर भाजप नेत्यांचे दडपण असल्याने विक्की कुकरेजा यांच्यावर कारवाई नाही’ – अनिल नगरारे
-
कारचालकाने तरुणाला चक्क नेलं फरफटत; वाहतूक पोलिसांनी केली कारचालकावर कारवाई
-
राजकारणाविषयी बोलताना गडकरी म्हणाले, ‘माझ्याशिवाय कुणी येऊच नये…’
-
संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट; झालेल्या चर्चेतून दिला सूचक इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
