Share

State Budget Session : ‘त्या’ मागणीसाठी भाजपची विधानभवन पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. काल (३ मार्च ) अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपने विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले तर आज भाजपकडून विधानभवनाच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे.

मुंबईकरांच्या मारेकरी दाऊदशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिक यांचा ठाकरे सरकारने राजिनामा घ्यावा अशी मागणी करीत भाजपा आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवली. आहे. यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांचीही उपस्थिती होती. दरम्यान एकीकडे भाजपकडून अजूनही आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत नवाब मलिक यांच्या कुटुंबियांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले आहेत.

त्यामुळे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच ओबीसी आरक्षणावरूनही भाजपने ठाकरे सरकारला घेरले आहे. त्यामुळे आजचे विधिमंडळ कामकाजही चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!