Share

मोबाईलला नेटवर्क नाही, गाड्याही मिळत नव्हत्या..; युक्रेनवरुन परतलेल्या औरंगाबादच्या विद्यार्थ्यांना आलेला अनुभव

Published On: 

औरंगाबाद: गेल्या नऊ दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बहल्ले करून अनेक शहरं उद्ध्वस्त केली आहेत. दरम्यान युक्रेनमध्ये भारतातील हजारो विद्यार्थी अडकले आहेत. त्यांना ऑपरेशन गंगाच्या माध्यमातून परत आपल्या मायदेशी आणण्याचे काम भारत सरकार करत आहे. गुरुवारी औरंगाबाद विमानतळावर युक्रेनमध्ये अडकलेले ७ विद्यार्थी परत आले. यावेळी त्यांनी त्यांची कहाणी सांगितली आहे.

युक्रेन मधून औरंगाबादमध्ये परतलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. युक्रेन मधून निघत्यावेळेस त्या ठिकाणी मोबाईलमध्ये सुद्धा नेटवर्क नव्हते, गाड्याही मिळत नव्हत्या त्यामुळे पाच-पाच, दहा-दहा किलोमीटर पायी चालावे लागले, असा अनुभव या विद्यार्थ्यांनी सांगितला आहे. मायदेशी परतल्यानंतर परिवाराला भेटून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तर त्यांच्या परिवाराने देखील त्यांचे विमानतळावर भव्य स्वागत केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!