नवी दिल्ली: रशिया-युक्रेन युद्धामुळे अनेक विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. त्यातच भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम राबवली जात आहे. मात्र यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कीव शहरातून मायदेशात निघालेल्या एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागली असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जनरल (निवृत्त) व्ही. के. सिंग (Union Minister of State for Civil Aviation General (Retd.) V. K. Singh) यांनी दिली आहे.
गोळीबारातच कर्नाटक विद्यार्थी नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता ही नवीन माहिती समोर आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यासाठी मोदी सरकारने केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्ही के सिंग यांना पाठवले आहे.
दरम्यान व्ही के सिंग पोलंड येथे असून त्यांनीच ही माहिती दिली आहे. त्यांनी पोलंडमधील गुरुद्वारा सिंग साहिब येथे राहणाऱ्या ८० भारतीय विद्यार्थ्यांचीही भेट घेतली आहे. दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात कर्नाटकातील नवीन शेखरप्पा आणि पंजाबचा चंदन जिंदाल या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाच्या बातम्या:
IND vs SL : विक्रमादित्य विराटच्या कर्तृत्वाला द्रविडचा सलाम..! फोटो पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान
State Budget Session : विधीमंडळ कामकाज सुरू होण्यापूर्वी मविआ नेत्यांची बैठक
यूक्रेन – रशियातली चर्चा हस्तांदलोनाने पडली पार, रशियन सरकारी चॅनलचं ट्विट
- युद्ध संपवण्यासाठी चर्चेची रशियाची तयारी, मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

