Share

IND vs SL : नवऱ्यासाठीचा ऐतिहासिक दिवस बायकोनं अजून बनवला खास; विराटसाठी अनुष्कानं….!

Published On: 

मुंबई: भारताचा फलंदाजी सुपरस्टार विराट कोहलीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होण्यापूर्वी बीसीसीआयने सकाळी त्याचा सत्कार केला. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जास्त १०० सामने खेळणारा कोहली हा १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराटला सामन्याआधी राहुल द्रविडने सन्मानित केले. मात्र यावेळी विराटच्या साथीला त्याची अर्धांगिनी म्हणजेच अनुष्का शर्मा मैदानावर उपस्थित होती.

अनुष्का शर्मा (anushka sharma) पती विराट कोहलीच्या (virat kohli) कारकिर्दीतील ऐतिहासिक क्षणासाठी मैदानावर त्याचा सोबत उपस्थित होती. कसोटीतील जर्सीच्या रंगाप्रमाणेच अनुष्कानेही पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता. विराट कोहली सन्मानित झाल्यानंतर तिने विराटला प्रेमाने मिठी मारली. तर विराटने तिच्या गालावर चुंबन दिले. विराटने याआधीही अनुष्का प्रतीचे प्रेम मैदानावर दाखवले आहे. अनुष्का मैदानावर उपस्थित असल्यावर जर त्याने अर्धशतक किंवा शतकी खेळी केली तर तो बॅटने अनुष्काकडे फ्लाईंग किस देताना दिसला आहे.

https://twitter.com/sdbgrx/status/1499593403041943553?s=20&t=MLc1vREb8gfUAj_YKbJ2Zg
https://twitter.com/Nara__Raakshasa/status/1499597625896566791?s=20&t=PvNAAyZm6VlAydWhOcQKgQ

विराट कोहलीला चिअर करण्यासाठी अनुष्का शर्मा नेहमी मैदानावर उपस्थिती लावत असते. अगदी तेव्हापासून जेव्हा विराट आणि अनुष्काचे लग्न झाले नव्हते तेव्हाही अनुष्का विराटसाठी चिअर करताना स्टँड्समध्ये दिसायची. विराट कोहलीने सन्मानित झाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांसोबत परिवाराचेही आभार मानले आहेत. त्यामुळे विराटच्या या स्पेशल दिवसाला त्याच्या बाजूला उभी राहत अनुष्काने अजूनच स्पेशल बनवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!