🕒 1 min read
मुंबई : कालपासून (३ मार्च) राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात झाली. मात्र पहिलाच दिवस गोंधळ, घोषणांनी गाजला. त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) भाषण देत असताना सत्ताधारी आमदारांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या दोन मिनिटांत आपले भाषण करून ते सभागृहातून निघून गेले. त्यामुळे राज्यपालांच्या या कृत्याचा अनेक नेत्यांनी निषेध केला. त्यातच आता राज्य मंत्रिमंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
दरम्यान राज्यपालांची ही कृती राज्याचा अवमान करणारी असून त्यांच्या या कृतीचा राज्य मंत्रिमंडळाने निषेध करून नापसंती व्यक्त करणारे पत्र राष्ट्रपतींना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच राज्यपालांनी सहकार कायद्यात बदल करणारे विधेयक परत पाठवल्याने हा संघर्ष अधोरेखित झाला आहे.
दरम्यान राज्यपालांच्या या कृत्याचा सत्ताधाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत कोश्यारी निषेध व्यक्त केला आहे. तसेच राष्ट्रवादीचे आमदार संजय दौंड यांनी तर थेट शीर्षांसन करीत राज्यपालांचा निषेध केला. दरम्यान मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा, यासाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
SWAG! केंद्रीय मंत्री दानवे आणि कपिल पाटलांची क्रिकेटच्या मैदानावरही तुफान फटकेबाजी
-
IND vs SL: विराटच्या १००वा कसोटी सामना पाहण्यासाठी स्टेडियम झाले हाऊसफुल!
-
IND vs SL: भारताचा श्रीलंका विरुद्ध पहिला कसोटी सामना आजपासून रंगणार ; विराट कोहलीसाठी ऐतिहासिक दिवस
-
Maharashtra Budget Session : राज्यपालांनी का सोडले अर्धवट भाषण?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
