🕒 1 min read
नांदेड: ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असून मागासवर्ग आयोगाने जो अहवाल सादर केला होता तो अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्देशांपर्यंत निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करता येणार नाही. यावरच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे आरक्षण रद्द केले असा खोटा प्रचार भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून केला जात असल्याचे म्हटले आहे.
“भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे चार पक्षच ओबीसी आरक्षणाचे मारेकरी आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत या चारही पक्षांना ओबीसी बांधवांनी मतदान करू नये. मागासवर्गीय आयेागाचा अहवाल कोणतेही संशोधन न करता सर्वोच्च न्यायालयात सादर केला. त्यामुळे न्यायालयाने हा अहवाल फेटाळला. यासाठी सर्वस्वी भाजपच जबाबदार असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
तसेच आरक्षण संदर्भात कायदा करून सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर करण्याची चांगली संधी राज्य शासनाला होती, परंतु सरकारने अद्याप काहीही केले नसल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी हे लुटारू सरकार असल्याची टीकाही केली. नांदेड दौऱ्यावर ते बोलत होते.
महत्वाच्या बातम्या:
-
IND vs SL : नवऱ्यासाठीचा ऐतिहासिक दिवस बायकोनं अजून बनवला खास; विराटसाठी अनुष्कानं….!
- State Budget Session : राज्यपालांच्या ‘त्या’ कृत्याचा राज्य मंत्रिमंडळाकडून निषेध; राष्ट्रपतींना पाठवणार पत्र
- यूक्रेन – रशियातली चर्चा हस्तांदलोनाने पडली पार, रशियन सरकारी चॅनलचं ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
