🕒 1 min read
पुणे : माणसाच्या आयुष्यात कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. तसाच काहीसा प्रकार आज पुण्यात घडला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी आपली चांगली ओळख असून आपण पुणे महापालिकेतून ५ कोटींचे बजेट तुम्हाला मिळवून देतो अशी भोलवण करून एका व्यक्तीला १० लाख रुपयांना फसवल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला आहे.
या १० लाख रुपयांच्या फसवणूकी प्रकरणी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पुणे शहरात वारजे परिसरात राहणारे महेश पटवर्धन यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. महेश पटवर्धन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या प्रवीण जगताप यांना अटक करण्यात आली आहे. तक्रारदार पटवर्धन आणि आरोपी जगताप यांची मध्यंतरी कामानिमित्त भेट झाली होती. तेव्हा माझी अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाशी (PA) चांगली ओळख आहे. तुमचे कुठलेही काम असेल तर मला सांगा मी ते लगेच करून देतो असे जगताप यांनी पटवर्धन यांना सांगितले होते. पटवर्धन यांनी सुद्धा जगताप यांच्यावर विश्वास ठेवला होता. नंतर जगताप यांनी पटवर्धन यांच्याकडून पुणे महानगरपालिकेचे ५ कोटींचे काम मिळवून देतो असे सांगत १० लाख रुपये आधी घेतले. परंतु आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच महेश पटवर्धन यांनी पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सुद्धा त्वरित कार्यवाही करत सातारा जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या प्रवीण जगताप यांना अटक केली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ठरलं तर! या नावाने खेळवली जाणार पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
- Russia Ukraine War: ऑपरेशन गंगा हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे द्योतक: नरेंद्र मोदी
- क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आठवतोय का? पाकिस्तानात 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी…
- ‘विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा नाही’ – जयंत पाटील
- “…तर अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही”, मलिकांच्या राजीनाम्यावरून भाजप आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
