🕒 1 min read
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना दाऊद इब्राहीमच्या नातेवाईकांबरोबर केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावरूनच भाजपने आक्रमक भूमिका घेत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
उद्यापासून (३ मार्च) सुरु होणाऱ्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप आक्रमक भूमिका घेणार आहे. गुन्हेगारांशी संबंध असलेल्या मलिकांच्या राजीनाम्यापर्यंत अधिवेशनाचे कामकाज होऊ दिले जाणार नाही, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
तसेच मलिक यांना पाठींबा देणे म्हणजे मुंबई बाँबस्फोटात शेकडोंचे बळी घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहीमला साथ देणे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मलिक यांचा राजीनामा बुधवारपर्यंत न घ्यावा अन्यथा भाजप कामकाज चालू देणार नाही. तसेच किरीट सोमय्या व त्यांच्या मुलावर करण्यात आलेले आरोप हे सर्व प्रकरण बाहेर काढू असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘त्या’ प्रकरणी मोदी सरकारविरोधात विधानसभेत निंदा प्रस्ताव आणणार; नाना पटोलेंचा इशारा
-
“प्रत्येकाचे मुखवटे उतरवल्याशिवाय राहणार नाही”; आर्यन खान प्रकरणावर संजय राऊत आक्रमक!
-
मोठी बातमी! आर्यन खानचा कोणत्याही मोठ्या ड्रग रॅकेटशी संबंध नाही; चौकशीत उघड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
