Share

Russia Ukraine War: ऑपरेशन गंगा हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे द्योतक: नरेंद्र मोदी

Published On: 

नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये ccचालू आहे. युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा अवलंबविला आहे. या युद्धामुळे जगातील अनेक देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या प्रतिकूल परिणामांना सामोरे जावे लागत आहे. भारत देशातील हजारो विद्यार्थी युक्रेन देशात वैद्यकीय शिक्षण घ्यायला जात असतात. मात्र हे विद्यार्थी युक्रेनमध्ये उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात अडकून पडले आहेत.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन गंगा नावाचा उपक्रम सुरु केला आहे. या ऑपरेशन गंगा द्वारे आत्ता पर्यंत अनेक भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यात आले आहे. ऑपरेशन गंगा अजून नीट प्रकारे  आमलात आणले जावे याकरता नरेंद्र मोदी सरकारने आपल्या मंत्रिमंडळातील ४ मंत्र्यांना युरोप खंडात पाठवले आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या  भारतीयांना आपण सुखरूप रित्या भारतात परत आणू शकतो हे भारताच्या वाढत्या शक्तीचे द्योतक आहे अशी स्तुती आज देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मोदी आज उत्तरप्रदेशमध्ये एका निवडणूक प्रचारा दरम्यान जनतेशी संवाद साधत होते तेव्हा त्यांनी वरील स्तुती केली.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने ४ मंत्री पाठवले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी कोणतीही दिरंगाई केली जाणार नाही. पूर्वी भारताला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी इतर देशांवर अवलंबवून राहावे लागत असे ; मात्र आता भारत देशाने गेल्या काही दशकात मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून यक्रेनमधील भारतीयांना सहजरित्या मायदेशात परत आणण्यासाठी सुरू केलेले ऑपरेशन गंगा हे आपल्या देशाचे वाढत्या ताकदीचे उधाहरण आहे असे आज मोदी उत्तरप्रदेशमध्ये प्रचार करताना म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!