Share

क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आठवतोय का? पाकिस्तानात 13 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी…

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : क्रिकेट इतिहासात आजचा दिवस (३मार्च) कोणताही क्रिकेटप्रेमी विसरणार नाहीत. या दिवसाला क्रिकेट विश्वात काळा दिवस म्हणून ओळखलं जात. आजच्याच दिवशी २००९ मध्ये पाकिस्तानच्या लाहोर शहरात श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर आतंकवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ८ पोलीस मारले गेले. तर ६ खेळाडू जखमी झाले होते. या आतंकी हल्ल्यातून पाकिस्तान आजही उभारू शकला नाही. त्यानंतर अजूनही या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले गेले नाही.

१३ वर्षानंतरही कोणताच संघ पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास तयार होत नाही. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे मोठे नुकसान झाले आहे. बोर्डाचे म्हणणे आहे की २० हजार डॉलर पेक्षा जास्त आमचे नुकसान झाले आहे. खेळाडूंना पगार देणे मुश्किल झाले आहे. पैसा नसल्यामुळे त्यांनी आपला स्टाफ ही कमी केला आहे. पाकिस्तान आजही सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये करत आहे.

पाकिस्तान सुपर लीगच्या काही सामन्यांचे आयोजनही युएईमध्ये केले जाते. या सगळ्याची भरपाई करण्यासाठी पीसीबी जास्तीत जास्त सामन्यांचे आयोजन पाकिस्तानमध्ये करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सध्या ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ २४ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये गेला आहे.

भारताच्या न जाण्याने पाकिस्तान बोर्ड होणार बर्बाद

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला २०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी चाम्पियान ट्रॉफीचे आयोजन करण्याची संधी मिळाली आहे. परंतु आता पासूनच शंका आहे. की पीसीबी एवढ्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करू शकेल का? जर भारतीय संघाने येथे खेण्यास नकार दिला तर पाकिस्तान बोर्ड पूर्णपणे बर्बाद होण्याची चिन्ह आहेत. या अगोदरच पीसीबी अध्यक्ष रमीज राजा बोलले होते की, भारताला वाटलं तर ते पाकिस्तान बोर्डाला बर्बाद करू शकतात.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!