Share

“गर्जेल तो पडेल काय? उगाच टीमक्या,डायलॉगबाजी अन्…”, भातखळकरांचा राऊतांन टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील वाद अधिकच तीव्र होत आहे. संजय राऊत यांनी जम्बो कोविड सेंटर मध्ये १०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे, तर किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी निकॉन कंपनीसंबंधी ४०० कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आता यावरच भाजप नेते अतुल भातखळकर (BJP leader Atul Bhatkhalkar) यांनी उडी घेत टीका केली आहे.

“गर्जेल तो पडेल काय? नील सोमैय्या यांच्या विरुद्ध संजय राऊत यांनी बोटभर तक्रारही केलेली नाही असे प्रतिज्ञापत्र EOW ने न्यायालयात सादर केले आहे. कुठे आहेत २५ हजार कोटींची भ्रष्टाचाराचे पुरावे? ED च्या विरोधातील साक्षीदार? उगाच पत्रकारांसमोर टीमक्या,डायलॉगबाजी आणि तोंडाच्या वाफा”, असा सवाल करत खोचक टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

२५ कोटींचे प्रकरण काय?

शिवसेना खासदार यांनी १५ फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद घेऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. “महाराष्ट्रातला आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात झाला. हा घोटाळा तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा होता. फडणवीसांच्या काळात खूप घोटाळे झाले, पण त्यातला सर्वात मोठा घोटाळा महाआयटीत झाला. या घोटाळ्याशी संबंधित अमोल काळे कोण आहे? विजय ढवंगाळे कोण आहे? त्यांना कुठं लपवलंय ते त्यांनी सांगावं. महाआयटीतल्या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रं, सर्वांचे अकाऊंट्स, त्यांच्या लिंक्स, त्यांचे मनी ट्रान्झॅक्शन्स, विना टेंडर कोणाकोणाला कंत्राटं दिली? कोणाला किती रुपये दिले? याची माहिती येत्या दोन दिवसात इओडब्लू आणि ईडीकडे दिली जाईल.” असे त्यावेळी संजय राऊत यांनी म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!