🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोपात युक्रेन आणि रशिया या दोन देशांमध्ये युद्ध चालू आहे. युक्रेनने NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) या संघटनेमध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रशियाच्या बलाढ्य लष्करासमोर युक्रेनचा टिकाव लागणे अवघड आहे. तरी युक्रेन आपल्या आपल्या परीने रशियाच्या आक्रमणाविरुद्ध लढा देत आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे जगातील सर्वच देशांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या फटका बसला आहे.
भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनच्या विविध शहरात शिक्षण घ्यायला आणि नोकरी करायला गेले आहेत. रशियाच्या आक्रमणामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्येच अडकून पडले आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी भारत सरकारने ‘ ऑपरेशन गंगा’ सुरु केले आहे. अनेक भारतीय या ऑपरेशन अंतर्गत परत भारतात देखील आले आहेत. तरी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकून पडले आहेत. रशियाचे लष्कर युक्रेनची राजधानी कीव्ह जवळ आले असल्याने भारतीय दूतावासाने कीव्हमध्ये असलेल्या भारतीयांना लवकरात लवकर कीव्ह सोडण्याचे आदेश दिले आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा हा आज सहावा दिवस आहे. चौथ्या दिवसापासून रशियाने युक्रेनची राजधानी असणाऱ्या कीव्हवर जोरदार हल्ले करायला सुरुवात केली आहे. यामुळेच तेथील भारतीय दूतावासाने कीव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना त्वरित कीव्ह सोडण्याचे आदेश दिले आहेत. तर आजपासून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी वायूदलाची C17 विमानं पाठवणार आहोत अशी माहिती केंद्र सरकारतर्फे देण्यात आली.
महत्वाच्या बातम्या :
- ‘दाऊदचा माणूस पवारांना चालतो’; निलेश राणेंचा गंभीर आरोप
- श्रीलंकेविरुद्ध कसोटीमध्ये उतारण्याआधी भारतीय खेळाडूंची फिरस्ती
- ‘या’ तारखेला उघडणार केदारनाथचे दरवाजे; महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर जाहीर
- “सत्ता जाण्याच्या भीतीनेच उद्धव ठाकरे…”, प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- संभाजी भिडेंचे वादग्रत वक्तव्य; म्हणाले,‘डॉक्टर XXXच्या लायकीचे असून त्यांच्याकडे कधीही जाऊ नका’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
