🕒 1 min read
जळगाव: औरंगाबाद येथे मराठी भाषा दिन व दासनवमीनिमित्त समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh koshyari) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना राज्यपालांनी समर्थ रामदास स्वामींशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका करण्यात आली.
भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर आता त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोशारी हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत, यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना कोशारी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे प्रेरणास्त्रोत आहेत, मला जेवढे जानकारी आहे समर्थ रामदास हे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत म्हणून मी ते वक्तव्य केलं, असे पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
VIDEO: ‘…अन्यथा राज्यपालांचे धोतर फेडणार’; विनोद पाटलांचा इशारा
-
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण २० जणांना दिल्ली दंगलीवरून उच्च न्यायालयाची नोटीस
-
‘…तरच आंदोलन मागे घेणार, अन्यथा मागे हटणार नाही’; राजू शेट्टी यांचा इशारा
-
‘महाराष्ट्राच्या नावाचं कुंकू आम्ही का लावायचं’ – वामराव चटप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
