Share

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण २० जणांना दिल्ली दंगलीवरून उच्च न्यायालयाची नोटीस

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  २०२० च्या फेब्रुवारी महिन्यात दिल्लीमध्ये धार्मिक दंगली झाल्या होत्या. या दिल्लीमधील दंगली प्रकरणावरून दिल्ली उच्च न्यायालायने सोनिया गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, अभिनेत्री स्वरा भास्कर आणि माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांच्यासह एकूण २० जणांना नोटीस बजावली आहे. २०२० मध्ये झालेल्या दिल्ली दंगलीवरून उच्च न्यायालयाने अनेक बड्या नेत्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा सुद्धा समावेश आहे.

दिल्ली येथे झालेल्या दंगलीत  पक्षकार म्हणून खटला का चालवू नये? असा प्रश्न नोटीस पाठवून न्यायालयाने त्यांना विचारला आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांना दंगलीबद्दल नोटीसा बजावण्यात तर आल्याच आहेत ; परंतु त्याच बरोबर भारतीय जनता पक्षाच्या अनेक बड्या नेत्यांचा पण यात समावेश आहे.  ज्या ज्या भाजप नेत्यांना उच्च न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत त्यात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, भाजप खासदार परवेझ वर्मा आणि कपिल मिश्रा यांचा समावेश आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या नोटिसांना उत्तर देण्यासाठी या लोकांना ४मार्च पर्यंतचा वेळ दिला आहे.

याचिकाकर्त्याने दंगल भडकवल्याबद्दल अनेक राजकारणी आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली होती. CAA आणि NRC या दोन कायद्यांवरून दिल्लीमध्ये आंदोलन चालू होते. या आंदोलनादरम्यानच दिल्ली येथे धार्मिक दंगली उसळल्या ;त्यात एकूण ५३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद दिल्ली पोलिसांनी केली आहे. या दिल्लीमधील दंगलीत काही राजकीय पक्षातील बड्या नेत्यांचा समावेश आहे अशी याचिका एका याचिकाकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात केली होती ; या याचिकेवरच सुनावणी घेताना दिल्ली उच्च न्यायालयाने एकूण २० जणांना नोटिसा बजावल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या :  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!