🕒 1 min read
नवी दिल्ली : सध्या युरोप खंडात रशिया विरुद्ध युक्रेन या दोन देशात युद्ध चालू आहे. युक्रेनने अमेरिका प्रणित NATO (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) मध्ये सहभागी होऊ नये म्हणून रशियाने युक्रेनवर आक्रमण केले आहे. रशियाचे लष्कर हे जगातील सर्वात ताकदवान असे दुसरे लष्कर आहे, तर जगातील ताकदवान लष्करात युक्रेनचा २० वा क्रमांक येतो. रशियाच्या बलाढ्य सैन्यासमोर युक्रेनचा निभाव लागणे हे अत्यंत कठीण आहे; असे असून सुद्धा युक्रेन रशिया विरुद्ध लढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
युक्रेनने जगातील सर्व बलाढ्य देशांची मदत मागितली आहे. जगातील इतर देश सुद्धा जमेल तश्याप्रकारे युक्रेनला मदत करत आहेत. रशियाने मध्यंतरी बेलारूसमध्ये युक्रेनने येऊन आमच्याशी वाटाघाटी कराव्यात तरच आम्ही हे युद्ध थांबवू असा प्रस्ताव युक्रेन समोर ठेवला होता. त्यातच आज रशिया देशाचे मंत्री आणि रशियातर्फे या युद्धात मध्यस्थी करणारे व्लादिमीर मेडिन्स्की यांनी आम्ही युक्रेन बरोबर युद्धबंदीचा प्रस्ताव करण्यास तयार आहोत अशी घोषणा केली आहे. युक्रेन आणि रशिया या दोन्ही देशांना मान्य असणाऱ्या अटींवर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत असे मत रशियन मंत्री व्लादिमीर मेडिन्स्की यांनी आज रशियामधील पत्रकारांशी बोलताना वक्त केले.
२४ फेब्रुवारी गुरुवार रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला करायला सुरुवात केली. त्यातच आज रशियाच्या वायुदलाने आज युक्रेनमध्ये हवाई हल्ले अजून तीव्र करायला सुरुवात केली आहे. जमिनी तसेच वायू आक्रमणाद्वारे रशियाने युक्रेनवर वर्चस्व निर्माण केले असले तरी अजूनही रशियाला युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आला नाहीये. युक्रेन त्यांच्या देशातील सामान्य नागरिकांचा ढाली सारखा वापर करत असल्याचा आरोप आज रशियाने केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maratha Reservation: संभाजीरजेंच्या डोळ्यात अश्रू; तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच
- भारतीय संघाचे आरामात मालिकाविजय मात्र सुनील गावस्करांना सतावतेय ‘या’ गोष्टीबाबत चिंता
- विराट कोहलीने सुरु केली ‘१००’ व्या कसोटी सामन्यासाठी प्रॅक्टिस
- Russia-Ukraine war : शांतता पुनर्प्रस्थापित व्हावी म्हणून दलाई लामा यांनी केली प्रार्थना


