नवी दिल्ली: आज पाच दिवस होऊनही अजून रशिया-युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या पार्श्वभूमीवर तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा ( Dalai Lama is the spiritual leader of Tibet) यांनी रविवारी युद्धग्रस्त देशात “शांतता पुनर्प्रस्थापित होण्यासाठी” तसेच संवाद आणि सहकार्यासाठी प्रार्थना केली.
यावेळी दलाई लामा यांनी अहिंसक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहनही केले आहे. युद्धाचा परिणाम सर्व जगावर होतो. ते म्हणाले की, “समस्या आणि मतभेद हे संवादाद्वारे उत्तम प्रकारे सोडवले जाऊ शकतात. तसेच परस्पर समंजसपणा आणि एकमेकांच्या हिताचा आदर यातूनच खरी शांतता निर्माण होते.”
Hope for Dialogue to Restore Peace in Ukraine https://t.co/DWec3mGHzK
— Dalai Lama (@DalaiLama) February 28, 2022
यावेळी त्यांनी युक्रेनच्या नागरिकांना शांततेच्या आशा न सोडण्याचे आवाहन केले आहे. तसेच २० वे शतक हे युद्ध आणि रक्तपाताचे शतक होते. २१ वे शतक हे संवादाचे शतक असले पाहिजे. असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान युक्रेनमध्ये ३५२ हून अधिक नागरिक आणि लष्करी कर्मचारी मारले गेले आहेत, ज्यात १४ मुलांचा समावेश आहे. आणि १ हजारहून अधिक जखमी झाले आहेत, अशी माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
“राजे स्वयंप्रकाशित होते”, राज्यपाल कोश्यारींच्या ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार संतापले
राज्यपालांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शरद पवारांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
बुमराहने सांगितली मुंबईतील सुरुवातीच्या दिवसाची आठवण म्हणाला “मी पॉंटिंगला …”
“…पैकी फक्त ९०० विद्यार्थी परतले; केंद्राने फार मोठा तीर मारला नाही”, वडेट्टीवारांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

