Share

बीसीसीआयचा मोठा फैसला; तीन जणांची समिती साहा-पत्रकार धमकी प्रकरणावर चौकशी करणार

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: एका पत्रकाराने रिद्धिमान साहाने मुलाखत देण्यास नकार दिल्यानंतर कथित धमकीच्या चौकशीसाठी बीसीसीआयने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. साहाने सुरुवातीला२३ फेब्रुवारी रोजी ट्विटमध्ये पत्रकाराचे नाव देण्यास नकार दिला होता. बीसीसीआयच्या बोलण्यावरून आता तो पत्रकाराची ओळख उघड करण्यास तयार आहे आणि त्याने चौकशीला संमती दिली आहे.

“भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रिद्धीमान साहाला (Wriddhiman saha) वरिष्ठ पत्रकाराकडून धमक्या मिळाल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे,” असे बीसीसीआयने निवेदनात लिहले आहे. तीन सदस्यीय समितीमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआय कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ आणि बीसीसीआयचे सर्वोच्च परिषद सदस्य प्रभातेज सिंग भाटिया यांचा समावेश आहे. समिती पुढील आठवड्यापासून या प्रकरणावर कार्यवाही सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे.

बीसीसीआयने म्हटले आहे की “केंद्रीय करार असलेल्या क्रिकेटपटूला एका ज्येष्ठ पत्रकाराने मुलाखतीसाठी विचारलेल्या मेसेजला प्रतिसाद न दिल्याबद्दल कथितपणे धमकावले होते”.या प्रकरणाची दखल घेत बीसीसीआयने साहाशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.पत्रकाराने पाठवलेल्या व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये धमकीचा सूर होता, “तुम्ही फोन केला नाही. यापुढे मी तुमची मुलाखत घेणार नाही. मी अपमान चांगुलपणाने घेत नाही. आणि मी हे लक्षात ठेवीन.” ४० कसोटी सामने खेळलेल्या साहाला भारतीय संघ व्यवस्थापनाने आधीच सांगितले आहे की तो भारताकडून पुन्हा खेळणार नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!