🕒 1 min read
मुंबई: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक पत्र लिहले होते. तसेच त्यांनी विराटला गोल्डन शूजसुद्धा गिफ्ट केले. युवी सिनियर असून सुद्धा विराट आणि युवी यांच्यात घनिष्ट मैत्री आहे. युवीने पत्रात विराटचे कौतुक केले तसेच त्याचे समर्थनही केले होते. युवीच्या या पत्राला विराटने उत्तर दिले आहे.
विराट कोहलीने युवी सारखेच इंस्टाग्रामवर पत्र टाकले ज्यात त्याने लिहले “या पत्रासाठी युवी पा धन्यवाद. ज्याने माझ्या कारकिर्दीला पहिल्या दिवसापासून उलगडताना पाहिले आहे, त्याच्याकडून हे येणे त्याचा खूप अर्थ आहे. तुझे जीवन आणि कर्करोगातून तुझे पुनरागमन केवळ क्रिकेटच नव्हे तर जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी होते आणि राहील. मी तुला तू असण्यासाठी ओळखतो आणि तू नेहमीच खूप उदार आणि तुझ्या आजूबाजूच्या लोकांची काळजी घेणारा आहेस. आता आम्ही आपण दोघेही पालक आहोत आणि जाणतो कि हा किती मोठा आशीर्वाद आहे. या नवीन प्रवासात मी तुला आनंद, सुंदर आठवणी आणि सदिच्छा देतो.”
https://www.instagram.com/p/CaTy2GXtUGS/?utm_source=ig_web_copy_link
युवीने देखील त्याच्या पत्रात भावनिक रित्या विराटचे कौतुक केले होते. “तू माझ्यासाठी नेहमी चिकूचं राहशील” अशा शब्दात युवीने विराट सोबतच्या प्रवासाबाबत लिहले होते. युवीने विराटचे महान खेळाडू होण्याबाबत लिहले तर विराटने एका प्रकारे युवीला पालक झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे. युवराज सिंगला नुकताच मुलगा झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- भारतीय माजी गोलंदाज अजित आगरकर दिल्ली कॅपिटल्सचा सहाय्यक प्रशिक्षक होणार!
- नवाब मलिक यांच्या अटकेनंतर भाजपचे आमदार अमित साटम यांची प्रतिक्रिया
- खासदार नवनीत राणा यांनी धरला फुगडीचा फेर
- “विराट सुपरह्युमन आहे तर धोनीच्या रक्तात बर्फ वाहते” ; शेन वॉटसनने केली माजी कर्णधारांची प्रशंसा
- नवाब मलिकांना ईडीकडून अटक! मुख्यमंत्री, शरद पवार, गृहमंत्र्यांमध्ये सायंकाळी बैठक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
