अमरावती: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या रडारवर आहेत. पहाटे पासूनच त्यांच्या घरावर छापेमारी सुरू करण्यात आली होती. तसेच नवाब मलिक यांची चौकशी देखील चालू आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यशोमती ठाकूर म्हणाल्या, ईडीला जर सरकार बनवायची घाई लागली असेल तर या, शिवाजी पार्कात या ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या साक्षीने आम्ही १७० जणं एकत्र भेटू. आणि एक सांगते, कदाचित तुमचं काम संपेपर्यंत १७० चा आकडा आणखी वाढलेला असू शकतो. महाविकास आघाडी सरकारची एकजूट तुटणार नाही, उलट मजबूत होत आहे, असं ठाकूर म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
-
‘नवाब मलिकांचे अनिल देशमुख होऊ देऊ नका’; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला
-
सौरव गांगुलीचे कार्यकाळ संपणार; ‘हे’ दोन नाव आहेत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत
-
“भाजप आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील किंवा…”; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
-
निवृत्ती सामन्यासाठी सचिनने केली होती बीसीसीआयला ‘हि’ विशेष मागणी
-
‘मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख गुन्हेगाराची जमीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकत घेतली’ – राम कदम
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
