पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची ईडी (ED) कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याबाबतीतही सुरुवातीला आरोप फेटाळले नंतर त्यांचा आवाज क्षीण झाला, आणि आता अनिल देशमुख कोण असा प्रश्न ते आपापसात विचारत आहेत. तसंच आता होऊ देऊ नका, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
छगन भुजबळ बिचारे दोन वर्ष आतमध्ये होते, आता अनिल देशमुख आतमध्ये आहेत. भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय, यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले कर नाही त्याला डर कशाला, ईडीची चौकशी आली तर घाबरता कशाला, त्यांनी चौकशीला सामोरं जावं,असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
“भाजप आणि ईडीचे अध्यक्ष एकच असतील किंवा…”; सुप्रिया सुळे यांची खोचक टीका
निवृत्ती सामन्यासाठी सचिनने केली होती बीसीसीआयला ‘हि’ विशेष मागणी
‘मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख गुन्हेगाराची जमीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकत घेतली’ – राम कदम
हरभजन सिंगचा खुलासा “धोनी क्रिकेटपेक्षा ‘या’ गोष्टीवर जास्त वेळ लक्ष देतो”
“शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे…” ; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप


