Share

निवृत्ती सामन्यासाठी सचिनने केली होती बीसीसीआयला ‘ही’ विशेष मागणी

Published On: 

मुंबई: सचिन तेंडुलकरने भारतासाठी त्याचा अंतिम सामना खेळून ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. पण मागे वळून पाहताना त्याची त्याने भारतासाठी केलेली कामगिरी आजही चाहत्यांना भावूक करतात. ३३,००० हून अधिक आंतरराष्ट्रीय धावा आणि १०० शतके पूर्ण करून, भारतासाठी २०० कसोटी पूर्ण केल्यानंतर सचिन तेंडुलकरने नोव्हेंबर २०१३ मध्ये आपल्या २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

सचिनने शेवटचा कसोटी सामना त्याच्या गावी मुंबईत खेळला, हा सामना पाहण्यासाठी मैदान खचाखच भरलेले होते. तिथे सामान्यांपासून सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र या सामन्याआधी सचिनने बीसीसीआयला एक विशेष विनंती केली होती. ज्याचा खुलासा त्याने नुकताच केला आहे. त्याने सांगितले “जेव्हा मी माझा शेवटचा सामना खेळणार होतो, तेव्हा मी बोर्डाला… बीसीसीआयला सांगितले की, हे दोन सामने माझे शेवटचे असतील पण माझी एकच विनंती आहे आणि इच्छा आहे की मी माझा शेवटचा सामना मुंबईत खेळावा जेणेकरून माझी आई स्टेडियम मध्ये येऊन मला खेळताना पाहू शकेल. त्यामुळे त्यांनी माझी विनंती स्वीकारत मुंबईत शेवटचा सामना आयोजित करण्यास सहमती दर्शवली आणि २४ वर्षात पहिल्यांदा आईने मला थेट खेळताना पाहिले.”

सचिनने यावेळी सांगितले कि त्याला परिवाराने खेळताना पाहणे आवडायचे नाही. मात्र त्याचा मोठा भाऊ अजित त्याला लपून पाहायचा. “याची सुरुवात माझ्या शालेय दिवसांपासून झाली. मला लाइव्ह खेळताना पाहणाऱ्या कोणाचाही मला तिरस्कार वाटत होता. त्यामुळे माझा भाऊ कुठेतरी झाडामागे लपून दिवसभर माझ्यावर लक्ष ठेवायचा. त्यामुळे माझ्या भावाने माझ्या आयुष्यातील प्रत्येक सामना पाहिला आहे. त्यामुळे तो मला पाहत असे आणि त्याच्या नोट्स तयार करत असे आणि आम्ही त्यावर चर्चा करत असू. तसेच, माझ्या भावाने कुटुंबातील सर्व सदस्यांना सांगितले की कोणीही त्याला लाईव्ह खेळताना पाहणार नाही. त्याला चांगली कामगिरी करायची आहे… त्याला धावा करायच्या आहेत आणि जर तो कुटुंबातील सदस्यांना पाहून विचलित होणार असेल तर ते चालणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!