🕒 1 min read
मुंबई: आजच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आणि केसीआर (K Chandrashekhar Rao) यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं होते. सकाळपासून या भेटीने राजकारणातला सस्पेन्स वाढवला होता. या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकारण गढूळ बनत असल्याचं सांगत आज नवी सुरुवात आम्ही केल्याचं म्हणाले.
या पत्रकार परिषदेत आणखी एक प्रकार बघायला मिळाला. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी के चंद्रशेखर यांच्यात कानात काही तरी सांगितले. मात्र तिथेच टेबलवर ठेवलेल्या माध्यमांच्या माईकनी ते रेकॉर्ड केले. राव बोलायला सुरू करायच्या आधी राऊत यांनी लगबगीने त्यांना कानात सांगितलं की फक्त तुम्ही बोल, नो क्वेशन अन्सरस, म्हणजे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देऊ नका. त्यानंतर राव यांनीही होकारार्थी मान हालवली आणि बोलण्यास सुरूवात केली.
काही दिवसांपूर्वीही संजय राऊतांनी एक मोठी वादळी हायव्होल्टेज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राऊतांचा फंडा नो क्वेशन, अन्सर हाच होता. त्यामुळे राऊतांना कसल्या प्रश्नांची भिती वाटतेय? अशा सवाल लोक विचारत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
-
‘तुम्ही शिवसेनेचं प्रोडक्ट आहात’; दादा भुसेंचा नारायण राणेंना खोचक टोला
-
‘बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच…’; के चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य
-
“महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, हजार किलोमीटरचे अंतर असूनही…”, चंद्रशेखर राव यांचे मोठे विधान
-
‘सुडाचं राजकारण ही हिंदुत्वाची संस्कृती नाही’; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

