मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्टता मिळाली नाही. मात्र यानंतर चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.
या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देशाच्या राजकारणाबाबत आणि परिस्थितीबाबत मी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. तसेच या सर्व विषयांबाबत एकमत झाले असल्याचे देखील राव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पुढे बोलताना के चंद्रशेखर राव म्हणाले, ठाकरे आणि आमचं अनेक विषयांवर एकमत झालं आहे. देशातील राजकीय परिवर्तनावर आमच्यात चर्चा झाली. बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच भेटणार असल्याचं के. चंद्रशेखर राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्याचबरोबर मी स्पष्ट करतो की आज एक सुरुवात झाली आहे, असं देखील के चंद्रशेखर राव म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
“महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, हजार किलोमीटरचे अंतर असूनही…”, चंद्रशेखर राव यांचे मोठे विधान
‘सुडाचं राजकारण ही हिंदुत्वाची संस्कृती नाही’; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
देशात परिवर्तनाची गरज; ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे विधान
आमच्या बैठकीचा चांगला परिणाम लवकरच पाहायला मिळेल- के. चंद्रशेखर राव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

