मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे यांचीही उपस्थिती होती. मात्र त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अजून स्पष्टता मिळाली नाही. मात्र यानंतर चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे राजकारणात चर्चा रंगली आहे.
या भेटीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देशाच्या राजकारणाबाबत आणि परिस्थितीबाबत मी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे चंद्रशेखर राव यांनी सांगितलं. देशाच्या विकासावर आणि येणाऱ्या काळातील दिशेबाबत चर्चा झाली. तसेच या सर्व विषयांबाबत एकमत झाले असल्याचे देखील राव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार अशा बातम्या येत होत्या याची आपल्याला कल्पना आहे. त्याचा योग आज आला. कालच शिवरायांची जयंती होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमची भेट होते. आम्ही या भेटीतील काही लपवलं नाही. देशात जे गढूळ वातावरण बनत आहे. सूडाचं राजकारण वाढत आहे. ही आपल्या देशाची हिंदुत्वाची संस्कृती नाही. हे असंच सुरु राहिलं तर देशाला भविष्य काय? याचा विचार कुणीतरी करायला हवा होता. त्याची सुरुवात आज आम्ही केलीय.
महत्वाच्या बातम्या:
देशात परिवर्तनाची गरज; ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे विधान
आमच्या बैठकीचा चांगला परिणाम लवकरच पाहायला मिळेल- के. चंद्रशेखर राव
के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

