🕒 1 min read
अमरावती: राज्यात गेल्या अनेक दिवासांपासून राजकारणाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात रोज आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. अशात केंद्रीय मंत्री नारायण राणेंही शिवसेनेवर आणि राऊतांवर अनेक आरोप करत आहेत. शिवसेनेकडूनही राणेंना (Narayan Rane) जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
आता कृषी मंत्र व शिवसेनेचे नेते दादा भुसे (Dada Bhuse) यांनी देखील नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला आहे. दादा भुसे सध्या अमरावती येथे आहेत. शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलत असताना दादा भुसे यांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे आता हे आरोप प्रत्यारोप आणखी वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट होताना दिसत आहे.
दादा भुसे राणेंवर निशाणा साधताना म्हणाले, नारायण राणे हे शिवसेनेचंच प्रोडक्ट आहे, हे त्यांनी विसरायला नको, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे. तर काही गोष्टीचे काळ वेळ उत्तरं असते. काही पोपट बोलतात ,काही जण बेछूट आरोप करतात. काही लोक पहाटेचा शपथविधी विसरले नाही, असे म्हणत त्यांनी राणेंवर पलटावर केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘बिगर एनडीए मुख्यमंत्री लवकरच…’; के चंद्रशेखर राव यांचे वक्तव्य
-
“महाराष्ट्र आणि तेलंगणा भाऊ-भाऊ, हजार किलोमीटरचे अंतर असूनही…”, चंद्रशेखर राव यांचे मोठे विधान
-
‘सुडाचं राजकारण ही हिंदुत्वाची संस्कृती नाही’; उद्धव ठाकरेंचे वक्तव्य
-
देशात परिवर्तनाची गरज; ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रशेखर राव यांचे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
