Share

काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा

Published On: 

🕒 1 min read

चंदीगड: जानेवारी महिन्यात देशाच्या निवडणूक आयोगाने देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. उत्तरप्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि पंजाब या पाच राज्यांच्या विधानसभेसाठी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात निवडणूका होणार आहेत. तर या निवडणूकांचा निकाल १० मार्च रोजी लागणार आहे. पंजाब राज्य सोडलं तर इतर राज्यात काँग्रेस सत्तेत नाही, त्यामुळे काँग्रेस पक्षाने पंजाब राज्यावर जास्त लक्ष केंद्रित केल्याचे दिसत आहे.

आज पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी पंजाब राज्यासाठी काँग्रेसतर्फे जाहीरनाम्याची घोषणा केली. पंजाबमध्ये कॉंग्रेस  चरणजीत सिंग चन्नी (Charanjit Singh Channi)  यांच्या नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवत आहे. राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. आज पंजाब राज्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिग चन्नी यांनी काँग्रेसतर्फे राज्यासाठी निवडणूक जाहीरनाम्याची घोषणा केली. त्यात, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर वर्षभर मोफत आठ गॅस सिलिंडर आणि गरीब आणि गरजू महिलांना प्रत्येक महिन्याला 1100 रुपये देणार आहे.

२०१७ साली झालेल्या निवडणुकीचा विचार केल्यास काँग्रेस पक्षाला सर्वाधिक ७७ जागा मिळाल्या होत्या, तर आम आदमी पक्षाला २० जागा मिळाल्या होत्या. शिरोमणी अकाली दल १५ तर भारतीय जनता पक्ष ३ जागांवर विजयी झाले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!