Share

“मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, कॉंग्रेसचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) ७ फेब्रुवारीच्या भाषणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. देशभर कोरोना पसरवण्यात कॉंग्रेस आणि महाराष्ट्र शासन जाबबदार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावरच कॉंग्रेसच्या तीव्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) यांनी मोदींच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ असा इशारा ट्वीट करत दिला आहे.

“७५ वर्षांतील सगळ्यात अपयशी व कर्तृत्वशून्य पंतप्रधानांचा असत्याचा विलाप व बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, महागाई, ८४% लोकांचे घटलेले उत्पन्न, चीनचे संकट यांवर उत्तर नसल्याने अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडण्याचा आटापिटा ३ दिवस देश पाहतो आहे.मात्र त्यांच्या प्रत्येक आकांडतांडवाचा जवाब देऊ”, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

मोदींच्या ‘त्या’ आरोपांवर कॉंग्रेसचे प्रत्युत्तर-

राज्यांनी लॉकडाऊन केला म्हणून करावा लागला असे मोदी यांनी म्हटले. मात्र मोदींनी कोणत्याही मंत्रालयाशी चर्चा न करता लॉकडाऊन जाहीर केला हे RTI द्वारे समोर आले. मग २१ दिवसांत कोरोनावर मात करु हे का म्हणाले? नंतर लॉकडाऊन का वाढविला? टाळ्या, थाळ्या व घंटा का वाजवायला लावल्या? असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे.

तसेच महाराष्ट्र काँग्रेसमुळे व मुंबईतील उत्तर भारतीय स्थलांतरित मजूरांमुळे कोरोना पसरला असा आरोपही मोदींनी केला. यावर  मोदींनी २४ मार्च २०२० ला लॉकडाऊन जाहीर केला. ८ वाजताच्या मोदींच्या भाषणाबरोबर ४ तासाची मुदत अधिक भितीदायक होती. मोदींनी २१ दिवसांत कोरोनावर मात करु म्हटले. ती मुदत १४ एप्रिलला संपली. पहिली श्रमिक ट्रेन १ मेला सुरू झाली. म्हणजे ३८ दिवसांनंतर. गुजरातमधून १०२७ ट्रेन निघाल्या व १५ लाख मजूर घरी परत गेले. महाराष्ट्रातून ८४४ ट्रेनमधून १२ लाख मजूर घरी परतले. मग कोरोना गुजरातमधून जास्त पसरला पाहिजे होता, महाराष्ट्रातूनच कसा पसरला? गुजरातमध्ये मजूरांना का नाही थांबवले? असा सवाल कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!