Share

IND vs WI: सलग १५ व्या वर्षी भारताचे विंडीजवर वर्चस्व कायम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने ४४ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने जिंकली आहे. सोबतच विंडीज सोबत हा ११ वा एकदिवसीय मालिका विजय ठरला आहे. यात विशेष म्हणजे २००७ पासून भारताने विंडीज सोबत झालेल्या सगळ्या एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत. भारतीय संघाने सलग १५ वर्षे विंडीजवर वर्चस्व कायम ठेवले आहे.

नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजी करताना भारतीय संघाने विंडीजला २३७ धावांचे लक्ष दिले. ज्यात भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने शानदार ६४ धावांची खेळी केली. तर विंडीज गोलंदाज जोसेफ आणि स्मिथ यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. भारताच्या २३७ धावांचे पाठलाग करताना विंडीजचा संघ १९३ धावांवर सर्वबाद झाला. भारतीय युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अप्रतिम गोलंदाजी करत ४ विकेट्स घेत भारताला विजय मिळवून दिला.

रोहित शर्माची पूर्णवेळ कर्णधार म्हणून हा पहिला मालिका विजय असणार आहे. १०००व्या एकदिवसीय सामन्यांसोबत विजयी सुरुवात केल्यानंतर भारताने मालिका विजय केला आहे. २००७ पासून सुरु झालेले विंडीज विरुद्ध मालिकेचे विजयी रथ भारतीय संघाने अजूनही कायम ठेवले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!