Share

“सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टींचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार? हा सामान्य माणसासमोरील आताचा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) आपल्या आजच्या सामना अग्रलेखात म्हणाले आहेत. तसेच सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेस सरकारांकडेच बोट दाखविणार आहे का? या एका बोटाचे सोडा, पण इंधन तेलापासून खाद्यतेलापर्यंत, भाजीपाल्यापासून मसाल्याच्या पदार्थांपर्यंत सर्वच बाबतीत महागाई रोज जो नवीन उच्चांक गाठत आहे, त्याची तीन बोटे तुमच्याकडेच निर्देश करीत आहेत, असेही राऊत म्हणाले आहेत.

लेखात राऊत म्हणाले आहेत की, देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी महागाईचा टक्का काही खाली घसरण्याची चिन्हे नाहीत. किंबहुना, प्रत्येक क्षेत्रात महागाईचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यात आता मसाल्याच्या महागाईची भर पडली आहे. मसाल्याच्या काही पदार्थांचे भाव अचानक वाढले आहेत. घटलेले उत्पादन हे त्यामागील कारण असले तरी त्यामुळे गृहिणींचे स्वयंपाकाचे बजेट आणि कुटुंबप्रमुखांच्या खिशाचे गणित आणखी बिघडले आहे. इंधन दरवाढीच्या सुसाट घोड्याला केंद्र सरकार अद्यापि काबूत ठेवू शकलेले नाही. मध्यंतरी काही प्रमाणात त्यावरील करात जरूर कपात करण्यात आली, पण ही कपात ‘दर्या में खसखस’ अशीच ठरली. त्यामुळे इंधन दर कमी होऊनही महागाई अजिबात कमी झाली नाही. उलट रोजच कुठल्या ना कुठल्या गोष्टीचे भाव वाढतच आहेत. आता मसाल्याच्या काही पदार्थांनीही दरवाढीच्या स्पर्धेत ‘आम्हीही मागे नाही’ हेच दाखवून दिले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे सर्वसामान्यांच्या खिशातील पैसे कमी झाले आणि मोदी सरकारच्या काळात वाढतच चाललेली महागाई त्याच्या ताटातील पदार्थ कमी करीत आहे. मोदी सरकार हल्ली सर्वच गोष्टींचे खापर नेहरू-गांधी आणि आधीची काँग्रेसी सरकारे यांच्यावर फोडत असते. लोकसभा आणि राज्यसभेतही पंतप्रधानांनी काल-परवा हाच पाढा वाचला. मोदी सरकारचा हा पाढा आता सामान्य जनतेलाही पाठ झाला आहे, पण सध्याच्या महागाईचे काय? आणि त्यासाठी कोण जबाबदार?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!