🕒 1 min read
नवी दिल्ली : ७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत बोलत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांनी काँग्रेसवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच काँग्रेस नेत्यांनी देशभर कोरोना पसरवला असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आजपासून(१० फेब्रु.)पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांना सुरुवात होत असून याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे.
संसदेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान काँग्रेस खासदार राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली. तद्पश्चात पंतप्रधान मोदींनीही लोकसभेच्या भाषणात काँग्रेसला खोचक टोले लगावले. यासंदर्भात मुलाखतीत बोलत असतांना मोदी म्हणाले की,‘काही विषयांवर आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने, संरक्षण मंत्रालयाने भूमिका मांडली असून ज्या विषयांवर गरज पडली, तिथे मी देखील स्पष्टीकरण दिले आहे. परंतु जे ऐकतच नाहीत, जे सभागृहात बसतच नाहीत, त्यांच्या वक्तव्यावर मी काय भूमिका मांडणार?’, असा सवाल मोदींनी केला आहे.
#WATCH PM Modi hits back at Rahul Gandhi, says, “How do I reply to person who does not listen, skips Parliament?” pic.twitter.com/ImiU1kGOUd
— ANI (@ANI) February 9, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘हल्ला करण्याची भाषा मला माहिती नाही किंवा माझा तो स्वभावही नाही. पण ज्या गोष्टी खऱ्या आहेत त्यांच्या आधारावर सभागृहात मी कोणती बाब सांगितली, तर माध्यमांमध्ये हेडलाई करण्यासाठी हल्ला या शब्दाचा वापर केला जात असेल. पण आम्ही हल्ला करत नाहीत, आम्ही संवाद करतो’, असेही मोदी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी आमदार रवी राणांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा
-
“सध्याच्या महागाईसाठीही मोदी सरकार नेहरू-गांधी आणि काँग्रेसकडे बोट दाखविणार का?”
-
अनिल देशमुखांनी दिली कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी; सचिन वाझेंचा गौप्यस्फोट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
