Share

‘…आणि मी नाही त्यातला म्हणायचं’; नारायण राणेंचा राऊतांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडीचा (ED) वापर महाराष्ट्रात सरकार पाडण्यासाठी होत असल्याचं म्हटलं आहे. दोन मंत्र्यांचा राजीनामा आणि सरकार पाडण्यासाठी दबाव येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर चांगलाच निशाणा साधला होता.

संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप नेते देखील आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी देखील संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे यांनी ट्विट करत म्हटलंय की, संजय राऊत यांचे वक्तव्य मुंबईचा दादा “शिवसेना” पण ती फक्त “मातोश्रीपुरतीच”, असं ट्विट करत टीका केली आहे.

पुढे बोलताना नारायण राणे म्हणाले, गुन्हे करायचे आणि मी नाही त्यातला, असे म्हणायचे ही वेळ संजय राऊत यांच्यावर आली आहे. धमक्या देण्याचे दिवस संजय राऊत आता संपले आहेत. पुढे त्यांनी म्हटलंय की, तुमची जागा बाहेर नाही आता “आत”, तेव्हा संजय राऊत धमक्या देणे बंद करा कोणी भीक नाही घालत तुमच्या धमक्यांना आणि भाजपवाले तर नाहीच नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!