🕒 1 min read
मुंबई: राज्यातील राजकारण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. शवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मंगळवारी उपराष्ट्रपती यांना पत्र पाठवले आणि त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्ला चढवला होता. यावर भाजप नेत्यांनी देखील आता संजय राऊत यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
अशातच आता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी वक्तव्य केलं आहे. राज्यातील सत्ता गेल्यानंतर भाजपला महाविकास आघाडी सरकार पाडायचे आहे. तीनपैकी एक पक्ष त्यांच्यासोबत जाण्याची परिस्थिती त्यांना निर्माण करायची आहे. त्यासाठी सेना नेत्यांच्या मागे ईडी लावली जात आहे, असं वक्तव्यं मलिक यांनी केलं आहे.
पुढे बोलताना नवाब मलिक म्हणाले, भाजपला वाटतंय की आमच्या सरकारमधील नेते घाबरून बाहेर पडतील. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कितीही सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तरी राज्यातलं सरकार आमच्या ताब्यात राहणारच आहे परंतु केंद्रातील सरकार आम्ही ताब्यात घेऊ, असा इशारा नवाब मलिक यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“..त्यावेळेस पत्र का लिहू वाटले नाही?”, केशव उपाध्येंचा संजय राऊतांन सवाल
-
“कर्तव्य म्हणून पत्र लिहिलं, अजून ट्रेलर यायचा आहे”, संजय राऊतांचे स्पष्टीकरण
-
हे ठाकरे आणि शरद पवारांच्या परिवाराला बदनाम करत आहेत; संजय राऊत संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
