🕒 1 min read
नवी दिल्ली: ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सीद्वारे तपास करण्याच्या नावाखाली राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा तसेच दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप करत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut warning about ED)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहिले आहे. यावरच त्यांनी पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया देताना कर्तव्य म्हणून पत्र लिहिलं, अजून ट्रेलर यायचा असल्याचे म्हटले आहे.
ईडी आणि इतर यंत्रणा भाजपा किंवा त्यांच्या मालकांच्या क्रिमिनल सिंडिकेटचा भाग बनले आहेत. राज्यात ठाकरे सरकार आल्याची वेदना मी समजू शकतो. मात्र बाहेरच्या यंत्रणा महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीर डांबून ठेवत आहेत. मुंबई पोलिसांनी यांच्यावर कारवाई केली पाहिजे. हे सर्व ठाकरे परिवार, आमच्या प्रमुख नेत्यांना, शरद पवारांच्या परिवाराला बदनाम करत आहेत. माझी मुख्यमंत्री, महाविकास आघाडी तसंच इतर नेत्यांशी चर्चा झाली आहे. मी लिहिलेले पत्र फक्त सुरुवात असून अजून ट्रेलर यायचा आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
मला देशभरातून सर्व प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांचे फोन आले असून महाराष्ट्र, बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन सरकार पाडायचे, त्यांच्याविरोधात खोटे पुरावे निर्माण करायचे हे सुरु आहे. पण आमच्यासारखे लोक या दडपशाहीला जुमानणार नाहीत, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. याबाबतच त्यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहित त्यांना याची माहिती देत पुढील लढाईला जावं यासाठी पत्र लिहिलं आहे. त्यामुळे कर्तव्य म्हणून हे पत्र लिहिलं असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- मुस्लिम महिला, मुली हिजाब का बांधतात; जाऊन घ्या
- हिंगणघाट जाळीत कांड: आज गुन्हा सिद्ध, उद्या होणार शिक्षा
- “लवकरच ईडी कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करणार”, संजय राऊतांचा इशारा
- ‘…आमच्या मनगटातील ताकद पहा’; भाजपचे संजय राऊतांना आव्हान
- हार्दिक पंड्यानंतर ‘हा’ मोठा खेळाडू रणजी ट्रॉफीतून बाहेर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
