नवी दिल्ली : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पत्रातून त्यांनी ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. हा फक्त ट्रेलर आहे, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
यावेळी संजय राऊत यांनी ठाकरे परिवार आणि शरद पवारांच्या परिवाराला बदनाम करण्यात येत आहे, असा आरोप केला आहे.”पवार कुटुंबाकडे पाच दिवस जाऊन ईडीचे लोक बसले होते. नेत्यांची नावं घ्या असं त्यांचं म्हणणं होतं. हेच आमच्या बाबतीत घडत आहे. आम्ही गुडघे टेकू असं वाटतं का?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते वारंवार मला अनिल देशमुखांच्या बाजूच्या कोठडीत जावं लागेल असं सांगत आहेत. तुमची इच्छा असेल तर कोठडीत जाऊ, पण लक्षात ठेवा आमच्या पाठोपाठ त्याच कोठडीत तुम्हाला देखील यावं लागणार आहे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘…आमच्या मनगटातील ताकद पहा’; भाजपचे संजय राऊतांना आव्हान
- हार्दिक पंड्यानंतर “हा” मोठा खेळाडू रणजी ट्रॉफीतून बाहेर
- “आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही”, संजय राऊतांचा इशारा
- “मुंबईचा दादा शिवसेना आहे”; संजय राऊतांनी भाजपला सुनावले
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी

