मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहून मोठी खळबळ माजवली आहे. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना असल्याचे म्हणत भाजपवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी घेतलेल्या या पत्रकार परिषदेनंतर भाजप आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे.
महाराष्ट्राचा अपमान तर या तीन पक्षांनी केला, असं सांगत महाविकास आघाडी सरकारवर केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंनी निशाणा साधला आहे. भाजपला राज्यातल्या जनतेने जनादेश दिला होता. त्यांनाच विरोधी बाकावर बसवलं. जनतेच्या जनादेशाविरोधात जेव्हा तुम्ही वागता तेव्हा अपमान होतो, असं दानवे म्हणाले.
संजय राऊत यांनी ईडीवर देखील पत्रातून खळबळजनक आरोप केले आहेत. यावर देखील रावसाहेब दानवे यांनी टीका केली आहे. दानवे म्हणाले, ईडीची (ED) कारवाई आताच होते आहे का? गुन्हेगार नसाल तर घाबरायचं काय कारण आहे?, असा सवाल रावसाहेब दानवेंनी संजय राऊत यांना केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
“लवकरच ईडी कार्यालयात काय सुरु आहे याचा पर्दाफाश करणार”, संजय राऊतांचा इशारा
“आम्ही तुमच्या घरात घुसलो तर नागपूरलाही जाता येणार नाही”, संजय राऊतांचा इशारा


