🕒 1 min read
मुंबई: राज्यात सध्या शिवसेना खासदार संजय राऊत विरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाद रंगला आहे. त्या दरम्यान संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती एम. वेंकया नायडू यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप करत भाजप सरकार ED चा वापर आणि दादागिरी करत माझ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच तुमचा सुद्धा लालू प्रसाद करू अश्या धमक्या मला येत आहे. या संबंधी त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सर्व गोष्टींचा खुलासा केला आहे. ते लवकरच मुंबईत शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपचा भांडाफोड करणार आहेत.
संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राचे देशभरात पडसात उमटत आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगडच्या बाबतीत केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून सरकारं पाडायची आणि प्रमुख नेत्यांचा गळा दाबायचा, त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करायचे, खोटे पुरावे निर्माण करायचे, त्यांना बदनाम करायचं, असे सगळे प्रकार ED मार्फत सुरू आहेत. परंतु मी कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणासमोर झुकणार नाही. ते दादागिरी करू पहात आहेत. मुंबईचा दादा शिवसेना आहे हे त्यांनी विरोधी पक्षाला ठणकावून सांगितले.
त्यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राऊत एक उत्तम पत्रकार आणि संपादक आहेत. त्यांना हेडलाइन काय करायची हे माहीत असते. ते सकाळी उठून तशी हेडलाइन देऊन दिवसभराचा मसाला मीडियाला देतात. त्यांना फक्त आरोप करता येतात असे फडणवीस म्हणाले. आम्ही सिंह आहोत गिधाडाला घाबरत नाही असे देखील ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- “मुंबईचा दादा शिवसेना आहे”; संजय राऊतांनी भाजपला सुनावले
- IPL 2022 :आयपीएलमधून “या” पाच खेळाडूंनी कमवले आहेत १५० कोटी
- “माझा राजकीय खून करण्याचा प्रयत्न केला जात आहे” जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
- “बालिश आरोप करण्यापेक्षा राऊतांनी न्यायालयात जावे”,अतुल भातखळकरांचा टोला
- एकमेव टी २० सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा न्यूझीलँडकडून पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
