Share

“..त्यावेळेस पत्र का लिहू वाटले नाही?”, केशव उपाध्येंचा संजय राऊतांन सवाल

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उपराष्ट्रपतींना पत्र (Sanjay Raut direct letter to Vice President) लिहिले असून यातून त्यांनी ईडीवर खळबळजनक आरोप केले आहेत. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील बाहुले बनली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान यावरच भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये (BJP spokesperson Keshav Upadhye) यांनी ट्वीट करत संजय राऊतांन सवाल केला आहे. “राज्य सरकार विरोधात लिहीले म्हणून नेव्ही अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारले. ठाण्यात मराठी युवकाला बंगल्यावर नेऊन मारले. तक्रार करायला गेलेल्या किरीट सोमय्या यांना मारहाण केली.त्या वेळेस पत्र का लिहावे वाटले नाही? अशीच अजून उदाहरण देता येईल. दडपशाही याला म्हणतात. हे सत्य कधी बोलणार?”, असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी पत्रात काय म्हटले?

अंमलबजावणी संचालनालयासारख्या कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सींचा वापर करून शिवसेना खासदार/नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात आहे. या प्रक्रियेत अंमलबजावणी संचालनालयाचे कर्मचारी आमच्या आमदारांना धमकावण्यास/छळण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.आम्हाला आमची स्वतःची विचारधारा असण्याचा अधिकार आहे आणि जो केंद्रात सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाशी संयोगाने असू शकत नाही. ईडी आणि इतर केंद्रीय एजन्सीद्वारे तपास करण्याच्या नावाखाली राजकीय विरोधकांना त्रास देण्याच्या आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच सुमारे एक महिन्यापूर्वी, मला काही लोकांकडून संपर्क करण्यात आला आणि त्यांना महाराष्ट्रात राज्य सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास सांगण्यात आले. राज्याला मध्यावधी निवडणुकीसाठी भाग पाडता यावे म्हणून मी अशा प्रयत्नात मोलाची भूमिका बजावावी अशी त्यांची इच्छा होती. असा दावाही संजय राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!