🕒 1 min read
केरळ: केरळमध्ये एका डोंगरावर अडकलेल्या एका ट्रेकरची भारतीय लष्कराने बुधवारी सुटका केली. २३ वर्षीय चेराट्टिल बाबू असे या ट्रेकरचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो डोंगरावर एका ठिकाणी अडकून पडला होता. केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मलमपुझा येथील ही घटना आहे. सुरवातीला केरळ सरकार त्याला मदत करण्याचा प्रयत्न करत होती. पण त्यात स्थानिक प्रशासनाला यश मिळत नव्हते. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी भारतीय लष्कराची मदत घेतली.
बाबूने सोमवारी दोन मित्रांसह डोंगरावर सुरु ट्रेक केला होता. माघारी उतरत असताना तो घसरला आणि एका खड्ड्यात तो अडकला होता. त्याच्या बरोबर त्याचे दोन मित्र ट्रेक करायला आले होते. त्यांनीच पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. बाबूच्या पायाला दुखापत झाली होती. पहिल्यांदा त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही म्हणून त्याचे मित्र टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले आणि त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर त्याला सोडवण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने त्या ठिकाणी पर्वतारोहकांच्या दोन टीम पाठवल्या होत्या. त्यानंतर बाबूला दोरीच्या साहाय्याने मलमपुळा येथील कुरुंबाची टेकडीच्या शिखरावर नेण्यात आले, तिथून त्याला विमानाने खाली नेण्याचे प्रयत्न सुरू होते. भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडच्या पर्वतारोहण तज्ज्ञांनी ही कामगिरी पार पडली आहे. बुधवारी पहाटे हे ऑपरेशन सुरू झाल्याचे दक्षिण कमांडने एका ट्विटमध्ये सांगितले होते. घाटात अडकलेल्या बाबूपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ठिकाणांहून प्रयत्न केले जात होते.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
