मुंबई : तब्बल दोन वर्षानंतर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील सर्वात महत्वाची स्पर्धा मानल्या जाणाऱ्या रणजी स्पर्धेतेचे आगमन होत आहे. येत्या १० फेब्रुवारी पासून २ टप्प्यात रणजी स्पर्धा खेळवली जाणार असल्याची घोषणा काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली. पहिला टप्पा आयपीएल आधी होणार आहे, तर रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा आयपीएल नंतर होणार आहे. रणजी क्रिकेट स्पर्धेत सर्वात यशस्वी असणाऱ्या मुंबई संघाचा कर्णधार या मौसमात कदाचित बदलला जाणार आहे. मुंबई रणजी क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई रणजी संघाची लवकरच घोषणा होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वर्षी मुंबई रणजी संघाची धुरा तरुण, तडाखेबाज फलंदाज पृथ्वी शॉ कडे सोपवण्याची तयारी मुंबई रणजी क्रिकेट संघाची निवड समिती करत आहे. तर भारताचा अनुभवी फलंदाज आणि भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य राहणेला पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळावे लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पृथ्वी शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय निवड समिती, प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि संघाने अजिंक्य रहाणेशी बोलल्यानंतर घेतला आहे.
अजिंक्य रहाणे याने विराट कोहली भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार असताना उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्याने भारताचे आतापर्यन्त ६ कसोटी सामन्यात भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व केले आहे, आणि विशेष म्हणजे त्यातील एकही कसोटी सामना भारताने गमावला नाहीये. पृथ्वी शॉच्याच नेतृत्वाखाली मागच्या वर्षी मुंबई संघाने विजय हजारे करंडक उंचावला होता.
२०२२ च्या रणजी स्पर्धेसाठी २०२१ च्या डिसेंबर मध्येच मुंबई संघाची घोषणा करण्यात आली होती मात्र तेव्हा अजिंक्य राहणे आगामी रणजी स्पर्धेसाठी उपलब्ध असेल का हे नक्की ठाऊक नव्हते, त्यामुळे पृथ्वी शॉच्याच नेतृत्वाखाली मुंबई संघ आगामी रणजी स्पर्धा खेळेल अशी माहिती पण आता समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- रोहित आणि विराटच्या वादावर सुनील गावस्करांचा नवीन खुलासा
- ‘आमचे सरकार तेव्हा पण शेतकाऱ्यांसोबत होती, आजही आहे’; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य
- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन रद्द ?
- महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही – सुप्रिया सुळे
- काँग्रेसला मायलेकाचा पक्ष असे नाव द्या – नरेंद्र मोदी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
