Share

‘उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करणार’; किरीट सोमय्यांचा इशारा

Published On: 

🕒 1 min read

पुणे: पुणे महापालिकेमध्ये (PMC) जात असताना भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर शिवसैनिकांनी (Shivsainik) धक्काबुक्की केली. किरीट सोमय्या यांना धक्काबुक्की होत असताना ते पायऱ्यांवरून घसरून पडले. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या सांगण्यावरून ही धक्काबुक्की करण्यात आल्याचा आरोप पुणे भाजप शहराध्यक्षांनी केला होता. तर भाजप नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.

पुण्यातील संचेती रुग्णालयात (Sancheti Hospital) किरीट सोमय्यांना दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या नंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. किरीट सोमायया यांनी संचेती रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले. किरीट सोमय्या म्हणाले, काल जी दुखापत झाली. त्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सगळे रिपोर्ट केले आणि उपचार केले. काल उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) माफीयासेनेचे अध्यक्ष ज्यांनी मला अडवण्यासाठी गुंडांना पाठवलं होतं, परत त्याच ठिकाणी आता जात आहे, असं सोमय्या म्हणाले.

पुढे बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, जे काल महापालिकेत माफीयासेनेनी गुंडगिरी केली होती. ते त्यांचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून केली होती, असा गंभीर आरोप त्यांनी केला. पुणे पोलिसांकडे तक्रार देणार आहे ती त्यांना पोलिसांपर्यंत घेऊ द्यायची नाही म्हणून हा सगळा खटाटोप सुरू आहे. कोव्हिड सेंटर प्रकरणाची चौकशी झाली तर उद्धव ठाकरेंना जाब विचारला जाईल आणि त्यांना याचं उत्तर देणं भारी पडणार आहे, असं सोमय्या म्हणाले.

तसंच पुढे सोमय्या म्हणाले, सुजित पाटकर (Sujit Patkar), संजय राऊत आणि ऑर्डर देणाऱ्या उद्धव ठाकरेंवर हत्येचा गुन्हा दाखल करावा लागणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. धक्काबुक्की दरम्यान सोमय्या यांना दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना इशारा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!