🕒 1 min read
मुंबई: प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावरील परेडमध्ये सहभागी झालेल्या चित्ररथांपैकी महाराष्ट्राच्या चित्ररथाला ‘सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ’ हा पुरस्कार मिळाला असून उत्तर प्रदेशच्या चित्ररथाला यंदाचा सर्वोत्तम चित्ररथ म्हणून गौरवण्यात आले आहे. तर सीआयएफच्या चित्ररथाला सर्वोत्तम सेंट्रल आर्म पोलीस फोर्समधील चित्ररथ म्हणून सन्मानित करण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे (NCP leader Amol Kolhe) यांनी सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन केले आहे.
“प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्यावतीने “महाराष्ट्रातील जैवविविधता मानके” या चित्ररथाचे राजपथावर झालेल्या पथसंचलनात सादरीकरण झाले होते. आज आपल्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्रातील सर्व जनेतसाठी हा अभिमानाचा पुरस्कार आहे. या चित्ररथ निर्मितीसाठी संकल्पना सुचविणारे, सर्व सहभागी कलाकार, कारागीर व महाविकास आघाडी सरकारचे मनःपूर्वक अभिनंदन.!”, असे ट्वीट अमोल कोल्हे यांनी केले आहे.
प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्यावतीने "महाराष्ट्रातील जैवविविधता मानके" या चित्ररथाचे राजपथावर झालेल्या पथसंचलनात सादरीकरण झाले होते. आज आपल्या चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार जाहीर झाला.#RepublicDayParade #RepublicDay #RepublicDayIndia pic.twitter.com/VxtaknRRXH
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) February 4, 2022
दरम्यान यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर झालेल्या पथसंचलनात “महाराष्ट्रातील जैवविविधता मानके” या चित्ररथाचे राज्याकडून सादरीकरण झाले होते. राज्यातील जैवविविधता दर्शवणारा चित्ररथ यावर्षी सादर झाला होता. आता राज्याचा रथ ‘सर्वाधिक लोकप्रिय चित्ररथ’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
- नितेश राणेंना न्यायालयीन कोठडी
- संसदेत बोलताना सुप्रिया सुळेंचा उडाला गोंधळ; म्हणाल्या, ‘खाल्ल्या मिठाला जागू…’
- “दयाधर्म चित्ती नाही, ते जाणावे भोंदू”, सचिन सावंतांची कराडकरांवर टीका
- “सिलेक्टर्सने तुझ्यावर निवडून उपकार केले.. ” विराटचे कोच हार्दिकवर भडकले
- “बंडा तात्यांचा त्रास होत असेल तर समोर या…”; रुपाली पाटलांचे वारकरी संप्रदायातील स्त्रियांना आव्हानं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

