Share

“सिलेक्टर्सने तुझ्यावर निवडून उपकार केले.. ” विराटचे कोच हार्दिकवर भडकले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या टी-२० वर्ल्ड कप संबंधित केलेल्या वक्तव्यामुळे वादात अडकला आहे. हार्दिकने नुकतेच सांगितले होते की, टी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याची फलंदाज म्हणून निवड झाली होती, पण त्याला बळजबरीने संघासाठी गोलंदाजी करावी लागली होती. त्याच्या या वक्तव्याने सगळेचं हैराण झाले. कारण स्पर्धेदरम्यान अव्वल सहा फलंदाजांमध्ये भारताकडे त्याच्याशिवाय कोणताही अष्टपैलू खेळाडूचा पर्याय नव्हता. तेव्हा कर्णधार विराट होता. आता माजी कर्णधार विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी हार्दिकवर त्या वक्तव्याचा संताप व्यक्त केला आहे.

हार्दिकवर भडकत राजकुमार शर्मा म्हणाले ” तो फिट नसतानाही सिलेक्टर्सनी त्याला टी-२० वर्ल्डकप साठी निवडून त्यावर उपकार केले आहेत. हार्दिकने केलेले विधान अपरिपक्व होते. प्रत्येक संघाच्या निवडीत कर्णधार आणि प्रशिक्षकाला काही ना काही मागणी असते. मात्र, अंतिम निर्णय निवडकर्त्यांचाच असतो. हार्दिकला संघ व्यवस्थापनाची साथ मिळाली होती. तर त्याने असे वक्तव्य करायला नको होते. संघात स्थान मिळाल्याबद्दल त्याने निवडकर्त्यांचे आभार मानले पाहिजेत. त्याला गोलंदाजी करता आली नाही म्हणून त्याची फलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. हार्दिक जर निवडकर्त्यांबद्दल बोलत असेल तर निवड समितीने त्याचे उत्तर द्यावे.”

पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून सुरुवातीच्या पराभवानंतर भारतीय संघ स्पर्धेच्या सुपर १२ मध्येच बाहेर पडला होता. मोठ्या स्पर्धांमध्ये हार्दिकच्या फिटनेसचा प्रश्न चिंतेचा विषय ठरला आहे. टी २० वर्ल्ड कप आणि आयपीएल मध्येही तो नीट गोलंदाजी करू शकला नव्हता. सध्या हार्दिक दुखापतीतून सावरण्यासाठी काम करत आहे. आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि टी-२० मालिकेसाठी त्याची निवड झालेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!