महाराष्ट्र देशा ब्यूरो/अभिलाष अपसिंगेकर : लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर बोलताना भाजपा खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यामध्ये महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रावरून वाद-विवाद चांगलाच रंगला होता. त्यामुळे पवार आणि विखे पाटील कुटुंबात असलेला वाद पुन्हा एकदा बघायला मिळाला.
संसदेत बोलताना भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी यूपीए सरकारवर जोरदार टीका केली आहे. विखे पाटील म्हणाले, यूपीएच्या १० वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातील सर्व साखर कारखाने बंद केले. आज राज्यातल्या ७० टक्के मंत्र्यांनी याच बंद कारखान्यांना फार कमी दरात खरेदी केलं आणि आज ते त्यांचे मालक होऊन बसले आहेत, असा देखील दावा सुजय विखे पाटलांनी केला.
या नंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या. यूपीए एक आणि यूपीए दोन विषयी सुजय विखे पाटील खूप काही बोलले. बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. पण मी फक्त त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की यूपीए एक आणि दोन मध्ये त्यांचे वडील सरकारमध्ये मंत्री होते. १० वर्ष तुम्ही ज्यांच्यासोबत होते, गांधी घराण्यासोबत तुमचे जवळचे संबंध होते, ते कदाचित तुम्ही विसरले असाल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी मराठीतल्या म्हणीचा वापर केला. मराठीत म्हणतात खाल्ल्या मिठाला जागा. कधीही कुणाचंही अगदी २ रुपयांचं जरी खाल्लं असेल, तर त्याला नेहमीच लक्षात ठेवा ही माझी संस्कृती आहे, हे मला माझ्या आईने शिकवलं आहे. मात्र ही म्हण म्हणताना त्यांचा गोंधळ उडाला आणि खाल्ल्या मिठाला जागू नका, असं त्या चुकून म्हणाल्या. नंतर त्यांनी हिंदीतून ती म्हण समजाऊन सांगितली मात्र मराठीतून बोलताना उडालेल्या गोंधळामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
“अमृता फडणवीसांनी मोठा जावाई शोध लावला”, ‘त्या’ वक्तव्यावर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
“गटबाजी करु नका; तुम्हाला बाळासाहेबांची शपथ”; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन!
पुण्यातील ‘त्या’ घटनेतील मृतांच्या कुटुंबियांसाठी अजित पवारांनी केली ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर
Gangubai Kathiawadi Trailer: गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर रिलीज, आलियाच्या जबरदस्त लूकने वेधले लक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

