Share

U19WC: प्लेऑफ सामन्यात पाकिस्तान संघाकडून श्रीलंका पराभूत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: अंडर १९ वर्ल्डकपच्या प्ले ऑफ सामन्यात पाकिस्तान संघाने श्रीलंकेचा २३८ धावांच्या मोठ्या अंतराने पराभव केला. पाकच्या कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू असलेल्या कासीम अक्रमच्या शतकीय खेळीमुळे पाकिस्तानला विजय प्राप्त झाला आहे.

पाकच्या कासीम अक्रमच्या ८० चेंडूत नाबाद १३५ धावांच्या जोरावर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३ बाद ३६६ धावा केल्या. ३६६ धावनाचा डोंगर सर करताना श्रीलंकेचा संघ केवळ १२७ धावांवर गारद झाला. धुव्वादार फलंदाजीनंतर कासिम अक्रमच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचे फलंदाज टिकू शकले नाही. अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कासिमने ३७ धावांत ५ विकेट्स घेतले.

युवा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकाच सामन्यात शतक आणि पाच बळी घेणारा कासिम हा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. अंडर १९ वर्ल्ड कपमध्ये आज अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसऱ्या स्थानासाठीचा प्लेऑफ सामना रंगणार आहे. सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारताकडून पराभव झाला होता , तर अफगाणिस्तानला इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. ५ फेब्रुवारीला भारत विरुद्ध इंग्लंडचा फायनल सामना होणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!