Share

येरवड्यात इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगार ठार; १० जखमी

Published On: 

पुणे : येरवडा येथील शास्त्रीनगर भागातील गल्ली क्रमांक ८ मधील एका इमारतीचा स्लॅब कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला तर १० जण जखमी झाले आहेत. या इमारतीचा लोखंडी सांगडा बांधण्याचे काम सुरु असताना हा सांगडा अचानक कोसळून ही दुर्घटना घडली आहे. काल रात्री ११ वाजेदरम्यान ही घटना घडली. अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.

इमारतीवर स्लॅब टाकण्यासाठी लोखंडी रॉडचा सांगडा उभा करण्याचे काम सुरु असताना हा महाकाय सांगडा अचानक कोसळला. रात्रीच्या वेळीही हे काम सुरु होते. त्याखाली तेथे काम करीत असलेल्या अनेक कामगार त्याखाली दबले गेले. अग्निशामक दलाला या घटनेची माहिती रात्री ११ वाजून १४ मिनिटांनी मिळाली. त्याबरोबर अग्निशामक दलाच्या ५ गाड्या, रुग्णवाहिका, १०८ च्या १० रुग्णवाहिका, पोलीस घटनास्थळी पोहचले.

हा लोखंडी सांगाडा इतका मोठा होता की त्याखाली दबलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी इलेक्ट्रीक करवतीचा वापर करुन हा सांगाडा कापला व त्यानंतर खाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढले. याबाबत पोलिसांनी सांगितले की, येथून १० कामगारांना बाहेर काढून ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यातील काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!