🕒 1 min read
मुंबई : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि अभिनेत्री समांथा (samantha ruth prabhu) यांच्याबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा रंगत असतात. तसचं समांथाला ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ऊं अंटावा’ या गाण्यानं मिळाली प्रचंड लोकप्रिता मिळली आहे. मात्र वैयक्तिक आयुष्यातील काहीं गाष्टीमुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
दरम्यान अभिनेता नागा चैतन्ययाच्याशी असणारं वैवाहिक नातं तुटल्यामुळं समंथा सध्या यातूनही सावरत आहे. ती बरीच पुढे आली आहे. तरी देखील काही गोष्टी मात्र तिला आठवणींमध्ये गुंतवून ठेवत असल्याचं बोललं जात आहे. आता हेच बघा ना समंथाला नाजा चैतन्यशी जोडून ठेवणारी गोष्ट म्हणजे तिच्या शरीरावरील टॅट्टू. तसेच समंथाच्या शरीरावरचे तीन टॅट्टू (Samantha’s tattoo) फारच अर्थपूर्ण आहेत. तिच्या मनगटावर दोन बाण असणारा एक टॅट्टू आहे. स्वत:ची ओळख स्वत: असा याचा अर्थ होतो. आणि तो तिच्या आवडीचा टॅट्टू समजला जातो.

तसेच समंथाच्या मानेवर मागच्या बाजूला पाठीच्या कणावर एक टॅट्टू आहे. याचं नातं तिच्या नागा चैतन्यसोबतच्या पहिल्या चित्रपटाशी आहे. Maaya Chesave’ असं त्या चित्रपटाचं नाव. YMC अशी तीन अक्षरं यामध्ये कोरली गेली आहेत. विशेष म्हणजे हे तिच्यासाठी फार खास आहे, कारण याच चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ती नागा चैतन्यला पहिल्यांदा भेटल्याची गोष्ट समोर आली आहे.
अभिनेत्री समंथाचा तिसरा टॅट्टू तिच्या कमरेच्या बाजूला अगदी बरच्या दिशेला आहे. ज्यामध्ये नागा चैतन्यचं टोपणनाव, ‘चै’ कोरलं गेलं आहे. समंथा आणि नागा चैतन्य या दोघांचीही केमिस्ट्री हेवा वाटण्याजोगीच होती. मात्र अचानक त्यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावरील पोस्टद्वारे त्यांनी २ ऑक्टोबर २०२१ ला त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. समंथानं विविध चित्रपट आणि काही वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा देखील झाली.
महत्वाच्या बातम्या:
-
‘कॉंग्रेसला मत म्हणजे…’; अरविंद केजरीवालांची कॉंग्रेसवर टीका
-
पुष्पाची क्रेझ काही थांबेना! मराठमोळा अभिनेता प्रशांत दामलेचा अल्लू अर्जुन स्टाइल व्हिडीओ, एकदा पहाच
-
जनतेशी नाळ असलेला नेता, चोपदारच्या लेक-जावयाची केली विचारपूस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
