Share

“संविधानावर सहानुभूतिपूर्वक…”; तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी मानले राहुल गांधींचे आभार

Published On: 

नवी दिल्ली: भारतीय अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२२ च्या चर्चासत्रात राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानावर सहानुभूतिपूर्वक, विश्लेषणात्मक भाषण दिल्याबद्दल तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी त्यांचे आभार मानले. राहूल गांधी यांनी आपल्या भाषणात, भारतीय जनता पार्टी तामिळनाडू राज्यावर कधीच राज्य करू शकणार नाही असे वक्तव्य केले होते.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अर्थसंकल्पाच्या पहिल्या दिवशी सभागृहाला उद्देशून भाषण केले होते. त्यानंतर आज चर्चासत्रात विरोधी पक्षाच्या बाजूने पहिले भाषण राहुल गांधी यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. भारताच्या फक्त दोनच संकल्पना आहेत. एक, भारत एक संघराज्य राष्ट्र आहे. आणि दोन, भारतीय लोकशाही ही एकमेकाच्या सुसंवाद, समजदारी, बंधुभाव आणि त्यागावर अवलंबून आहे. असेही ते म्हणाले.

पुढे बोलताना गांधी म्हणाले, जेव्हा जेव्हा कोणी एखाद्या राष्ट्रावर काठी घेऊन हुकूमत करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तेव्हा त्यांची हुकूमत लयाला गेली. काँग्रेससने अशीच राजेशाही व्यवस्था १९४७ साली संपवली. शेतकऱ्यांनी तीन कृषी कायद्यांविरुद्ध दिलेल्या लढ्याचा देखील त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. परराष्ट्र धोरनाबाबत त्यांनी केंद्र सरकारवर निशाण साधला. चीनच्या लधाक मधील घुसखोरीवर त्यांनी सडकून निशाण साधत केंद्र सरकारला धारेवर धरले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!